Pune Porsche Crash Latest Updates – पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी (2 police suspend) निलंबित

Pune Porsche Crash Latest Updates – पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित

रविवारी ( १९ मे रोजी ) पहाटे पोर्श कार बेशिस्तपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक होती. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, आज सकाळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनेसंदर्भात पोलिसांनी आत्तापर्यंत काय तपास केला, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली होती. तसेच हा अपघात घडल्यानंतर पोर्श या गाडीतील ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी त्यांचा मुलगा गाडी चालवत नव्हता हे दाखवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती चौकशीत समोर आल्याचंही पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं होतं.

Pune Porsche Crash Latest Updates: पुण्यातल्या अल्पवयीन गर्भश्रीमंत मुलाने पोर्श कारने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना धडक दिली. त्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. हा अल्पवयीन मुलगा पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. या प्रकरणात या मुलाला जामीनही मिळाला ज्याचे पडसादही राजकीय वर्तुळात आणि समाजात उमटले. ज्यानंतर या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. यानंतर आता मुलाच्या आई वडिलांनी त्यांच्या कार चालकाला पैशांचं आमिष दिलं होतं, आरोप चालकाने त्याच्या डोक्यावर घ्यावा यासाठी हे आमिष दिलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

Pune Porsh car

अल्पवयीन मुलला बालसुधारगृहात धाडण्यात आलंय

पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. बाल न्याय मंडळाने याबाबतचे आदेश बुधवारी रात्री दिले.बाल न्याय मंडळाचे प्रमुख दंडाधिकारी एम. पी. परदेशी, सदस्य डॉ. एल. एन. धनवडे, के. टी. थोरात यांच्या मंडळासमोर सुनावणी झाली. बुधवारी दिवसभर या प्रकरणावर सुनावणी झाली होती. सुनावणी झाल्यानंतर मंडळाने निकाल राखून ठेवला होता. रात्री आठच्या सुमारास बाल न्याय मंडळाने निकाल दिला. त्यानंतर मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. यानंतर आता पोलीस सूत्रांनी नवी माहिती दिली आहे.

एनएनआयने दिलेल्या वृत्तानुसार याप्रकरणी दोन पोलीस  ( 2 police suspend)कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. येरवडा पोलीस

ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ही घटना घडल्यानंतर दोघांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=jfSQB2w4tb0&list=RDNSjfSQB2w4tb0&start_radio=1

https://parisarnews.com/maharashtra-board-ssc-10th-result/

Click here to share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version