RTE admission 2024:
राज्यात आरटीई प्रक्रिया १७ मे 2024 पासून सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) देण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्य शासनाने बदल केला होता. त्या विरोधात पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने शासनाच्या सुधारीत आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया रखडली होती. न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या आठवड्याभरानंतर आरटीई प्रवेश प्रक्रियेचा मुहूर्त लागला आहे. आता आरटीई प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरु झाली आहे.
काय केला होता बदल
विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरात अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असल्यास त्याच शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. खासगी शाळेत प्रवेश देण्यात येणार नाही. या बदलास पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने शासनाने केलेल्या या बदलास स्थगिती दिली.
शासण्याच्या नवीन निर्णयामुळे सर्व सामान्य विद्यार्थ्यांनी इंग्लिश मेडीयम शाळेत प्रवेश घेणे अवघड झाले होते. श्रीमंत मुलांनी इंग्लिश मेडीयम आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी साशकीय शाळा असा भेदभाव या मुले झाला असता .
RTE म्हणजेच ‘Right to Education’ (शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश कोणाला मिळतो?
सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक: यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि इतर मागास वर्ग (OBC) यांचा समावेश होतो.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग: वार्षिक उत्पन्न मर्यादा ओलांडत नसलेले कुटुंबे यामध्ये येतात. अनेक राज्यांमध्ये ही मर्यादा वेगवेगळी असू शकते, परंतु साधारणपणे ती ₹1 लाख ते ₹2.5 लाखांच्या दरम्यान असते.
इतर विशेष श्रेणी: अनाथ, HIV बाधित, अपंग, आणि युद्ध विधवा यांचे मुलं.
RTE अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, पालकांनी काही ठराविक दस्तऐवजांची आवश्यकता असते, जसे की उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, आणि रहिवास प्रमाणपत्र. या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज देखील उपलब्ध असतो.
अधिक माहिती साठी आजच या संकेत स्थळाला भेट द्या
https://student.maharashtra.gov.in